Skip to main content

Posts

Featured

स्पिकिंग फ्रेम्स: सुनता है मेरा खुदा..

मेजर जयदेव (अनिल कपूर) एक महत्वाचं मिशन फत्ते करून आपल्या शहरात परत आला आहे. शहर त्याच्या स्वागताला सज्ज आहे. सगळ्या लोकांच्या घोळक्यात अंजली (माधुरी दिक्षित) त्याची वाट पाहतेय, पण त्याला गर्दीने वेढलेले आहे. अंजली त्याला हातवारे करत आहे, हाका मारत आहे, पण त्याचे लक्ष नाहीये. त्याच संध्याकाळी त्याच्या सन्मानार्थ एक छोटासा कार्यक्रम कम पार्टी (ज्यादा 🙊 sorry, couldn't resist) आयोजित केली आहे. तिथं अंजली एक डान्स परफॉर्मन्स करते. तिची नजर जयवर अनेकदा खिळते. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, मोजदाद करता येईल याच्या पलीकडचा आहे. जय! तिचं लहानपणीपासूनचं प्रेम. एकत्र खेळले, वाढले, एकाशिवाय दुसऱ्याचं पान हलत नाही, अशी परिस्थिती. जयच्या आई-वडिलांनी तर तिला केव्हाच सून मानलं आहे. पण... हा 'पण' असल्याशिवाय, कुठलीच प्रेमकहाणी पूर्ण होत नाही. असो. पण... या सगळ्यांपासून अनभिज्ञ असणाऱ्या जयची नजर मात्र त्या पार्टीत खिळली आहे ती पुजावर (नम्रता शिरोडकर). पूजा, एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरची मुलगी, तिच्यावर सदैव तिच्या इनसेक्युर आईचा पहारा. मॉडेलिंगमध्ये आवड असणारी, देखणी आणि मोहक पूजा. का

Latest Posts

लुटेराची सहा वर्षे

कबीर सिंग आणि नैतिकता

राघवनचा नॉट सो टिपिकल नायक

इस्त्रायल-पेलेस्टाईन वादावर नेमके भाष्य करणारी सिरीज, फौदा

Kavaludaari

Chashme Baddoor

बाप ट्रायोलॉजी

झोया फॅक्टर

नादान परिंदे, घर आजा

C/o Kancharapalem, fall in love of love