वो तो हैं अलबेला


तो कुठल्याही बाबतीत वरचढ नव्हता. सामान्य, रादर अतिसामान्यच होता, अगदी नावासाहित.

'सुनील', किती सामान्य नाव, गर्दीतला कुणीही साधारण मनुष्य निवडावा आणि तो सुनील असावा, असं नाव.

त्याचा शिक्षणात रस नव्हता, त्याला संगीताची प्रचंड आवड होती, परीक्षेत फेल व्हायचा, त्याच्या जिवलग मित्राशी देखील ऍनाच्या बाबतीत खोटे बोलायचा, कारण त्याचे तिच्यावर अतोनात प्रेम होते, तिला इम्प्रेस करण्याचे सर्व प्रयत्न त्याने करून पाहिले, अखेरीस तीही त्याला मिळाली नाही, घरी खोटे रिजल्ट दाखवून बापाच्या मनातूनही उतरला..

हा असा कुठे हिरो असतो का राव?

असतो..! आपण प्रत्येक जण असतो, म्हणूनच आपल्याला सुनील जास्त रिलेट होतो, मनाला भिडतो.

कसलाही हिरोपणाचा आव नाही, कुठलीही असामान्य गोष्ट तो करत नाही, जागोजागी हरतो, रडतो, खोटे बोलतो पण पुन्हा जिद्दीने उभा राहतो,  सर्वांसमोर खरे बोलायची हिम्मत दाखवतो, तो सर्वांपेक्षा 'अलबेला' आहे हे सिद्ध करतो, म्हणूनच तो मनाच्या अगदी जवळचा वाटतो.

कभी हा कभी ना आणि सुनील हे दोन्ही कायम हृदयाच्या जवळ राहतील. आज या अजरामर चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही अजूनही तो तितकाच चिरतरुण आहे आणि राहील, आपल्या प्रत्येकात दडलेल्या सुनीलप्रमाणे.

- राज जाधव (२५-०२-२०१८)

#24_Years_Of_Kabhi_Haa_Kabhi_Naa

Comments

Popular Posts