जिंदगी के सफर में


'जिंदगी', हा गाण्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या शब्दापैकी एक. 'जिंदगी' म्हटल्यावर किती गाणी आठवतील, याची मोजदादही जवळपास अशक्य.

गुलजार, हृदयाच्या जवळ असल्यामुळे सर्वप्रथम आठवायला हवी ती, 'तेरे बिना जिंदगी से..', 'तुझ से नाराज नही जिंदगी', 'ए जिंदगी गले लगा ले', 'जिंदगी युं हुई बसर तनहा' वगैरे, पण या सर्वांच्या आधी चटकन ओठांवर येतं ते, 'जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम..' हे गाणं.

काही गीतकार साध्या शब्दात इतकं अफाट लिहून जातात, की ते अगदी सहजतेने काळजाला भिडतं. आनंद बक्षी हे त्यापैकीच एक नाव.

आनंद बक्षी या नावाने एक काळ गाजवला, पण त्यांना इतर शायर आणि उर्दू गीतकारांपुढे त्यामानाने जरा कमीच लेखलं जातं. पण जवळपास चार दशक सातत्याने, विषयाला आणि काळाला अनुसरून गाणी लिहीत राहणे, तेही कालबाह्य न होता, हे खरंच वाखाणण्याजोगे आहे.

बक्षीसाहेबांनी अनेक अजरामर गीते दिली पण त्यांचे नाव उच्चारताच सर्वात आधी आठवतं, ते हे गाणं.

रचनेत कमालीचा साधेपणा आहे. शब्दांचे कसलेच आढेवेढे न घेता लिहिलेलं, मोजक्या शब्दात नेमक्या भावना मांडत, हृदयात थेट हात घालणारं गाणं.

आयुष्याच्या प्रवासात वेळ आणि प्रेम कुणासाठीही थांबत नाही, त्याची कदर करायला हवी. एकदा ते क्षण, ती हृदयाजवळची माणसे आपण गमावली, हरवली की ती परत येत नाहीत. आयुष्यातील हे भयाण वास्तव आणि तत्वज्ञान मांडणारे हे गाणे.

बक्षी साहेबांइतकंच हे पंचमदा आणि किशोर कुमारचं देखील गाणं आहे. पंचमचं कंपोजिशन आणि किशोरच्या दर्दभरा आवाज हा खरा आत्मा आहे गाण्याचा. पहिल्या प्रिल्युडपासून हे गाणं आपला ताबा मिळवतं ते अगदी संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही.

बाकीच्या सगळ्या गोष्टी इतक्या जमून आलेल्या आहेत की, आपण राजेश खन्नाशीही जमवून घेतो.

- राज जाधव (०८-११-२०१७)
-----------------------------------------------------

ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर  नहीं आते

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं
वो हज़ारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में ...

आँख धोखा है, क्या भरोसा है
आँख धोखा है, क्या भरोसा है सुनो
दोस्तों शक़ दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हज़ारों सलाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में ...

सुबह आती है, शाम जाती है
सुबह आती है, शाम जाती है यूँही
वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात सुबह-ओ-शाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में ...


Comments

Popular Posts