जरा सी जिंदगी


कमल हसनचा अजून एक दुर्लक्षित चित्रपट म्हणजे 'जरा सी जिंदगी'.

'जरा सी जिंदगी' हा के. बालचंदरच्या मूळ तामिळ चित्रपटावर बेतलेला आहे. के. बालचंदर आणि कमलने 'एक दुजे के लिये' नंतर पुन्हा एकत्र आले ते या चित्रपटात, पण कदाचित त्याला एक दुजे के लियेच्या यशाची चव चाखता आली नसावी.

कमल हसन, अनिता राज, श्रीराम लागू, निळू फुले आणि मझहर खान मुख्य भूमिकेत आहेत. गुलजार यांचे संवाद आहेत. लक्ष्मी प्यारे यांच्या संगीतातील, येसुदासने गायलेलं 'जमाने से कुछ लोग डरते नही हैं..' माझं आवडतं गाणं आहे.

अनएम्प्लॉयमेंट आणि त्यामुळे आलेली वैचारिक बेकारी हा चित्रपटाचा मूळ विषय असला तरी प्रेम आणि प्रत्येकाची आपापल्या परीने चाललेली जगण्याची धडपड यावरही तो उत्तम भाष्य करतो.
यातील एक सीन अचानक आठवला, म्हणून हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन केले.

कमल सोबत त्याचे अजून दोन बेरोजगार मित्र राहत असतात. अमित आणि तिलक. नेहमीच्या बेरोजगारीला कंटाळून अमित एका मुलाचे अपहरण करतो आणि त्याला कमलकडे घेऊन येतो. मुलाच्या आई बापाकडून याच्या बदल्यात काही रक्कम मागू म्हणजे आपले हे दिवस संपतील, हे त्या मागचे प्रयोजन. पण कमलला हे पटत नाही आणि तो ते मूल त्याच्या आई बापाकडे जाईल याची व्यवस्था करतो. कमलने अमितला जाब विचारल्यावर तो हे सगळं दिलीपच्या सांगण्यावर केले असल्याचे बोलतो. ही गोष्ट नंतर कळते की दिलीप नावाची कुणी व्यक्ती नसून, ती त्याची निगेटिव्ह मेंटेलिटी आहे. ती अमितवर हावी झाली म्हणून त्याने हे केले.

असे बऱ्याचद आपल्या बाबतीतही होते, नाही का? दिलीपला अमितवर हावी होऊ द्यायचे नाही. हे जमलं तर आपली 'जरा सी जिंदगी' सुकर होईल.

अजून एकदा पाहिला तर बऱ्याचश्या गोष्टी रिकलेकट् होतील. सध्या एवढेच.

- राज जाधव (०७-११-२०१७)

Comments

Popular Posts