चमेली की शादी

चरणदास वेड्स चमेली.

आजच्या तनु वेड्स मनु वाल्यांना याची मजा कळणार नाही. लहान असताना कितीतरी पारायणं केली आहेत याची.
अनिल कपूरचा एसपायरिंग पहेलवान म्हणून चरणदासचा रोल. बाह्या मागे करत करत, खांदे उडवत चालायची त्याची लकब, टिपिकल हसायची पद्धत.

त्याचा गुरू आणि बायकांपासून चार हात लांब राहणारा ओम प्रकाश. चरणदासचा मोठा भाऊ भजनदास झालेला सत्येंन कप्पू.

कल्लूराम 'कोयलावाला' च्या अफलातून भूमिकेतला वर्साटाईल पंकज कपूर. हेंजी हेंजी करत, जीभ बाहेर काढत बायकोकडे बघत त्याची बोलायची पद्धत. ते तोंड परत हाताने धरून समोर करणारी त्याची बायको, भारती आचरेकर. तिचा भाऊ बेरकी बेवडा, छदामी म्हणजेच अन्नू कपूर. काय एक से बढकर एक फौज होती यात.

कधी नव्हे ती यात आवडलेली अमृता सिंग. येडपट, खूळच्याटपणाचा परफेक्ट नमुना. तिच्या गोंडस मैत्रिणीबरोबरचा (त्यावेळी तीही आवडलेली) हॉटेलमधला सीन तर एपिक.

आणि या सर्वांच्यावर कहर म्हणजे सर्वांना आपल्या तालावर नाचायला लावणारा अमजद खानने साकारलेला वकील हरीश.

जबरदस्त नॉस्टॅलजीक आहे हा चित्रपट. किती वेळा पाहिला असेल, याचा हिशोब नाही. आजकाल अशी क्लीन आणि नीट कॉमेडी पाहायला मिळत नाही. बासुदा तुसी ग्रेट हो.

- राज जाधव (०६-१०-२०१७)

Comments

Popular Posts