अक्स


तुम्ही अनु मलिकला कितीही नावे ठेवली, त्याच्यावर चोरीचे आरोप (?) लावले (अगदी मी धरून) तरी त्याचे काही अल्बम्स आउटस्टँडिंग आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही.

असाच एक अल्बम, 'अक्स'. राकेश ओमप्रकाश मेहराचा आउट ऑफ द वे जाऊन केलेला दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न. चित्रपट काहीसा 'फेस ऑफ' शी साधर्म्य दाखवणारा वाटत असला तरी वेगळा आहे, एक ती कन्सेप्ट सोडली तर तसा मूळ चित्रपटाशी याचा संबंध नाहीये. पहिल्याच चित्रपटासाठी अक्ससारखा विषय मांडल्याबद्दल मेहरांचं कौतुक करायला हवंय.

अमिताभने साकारलेला 'मनू वर्मा' आणि मनोज वाजपायीचा 'राघवन' ब्रिलियंट वाटतात. ते दोघे समोर येतात तेव्हा एकमेकांना पुरून उरतात. मनूचं राघवन म्हणून झालेलं ट्रान्सफॉर्मेशनही कमालीचं साकारलंय अमिताभने, नो डाऊट ही इज अ ग्रेट ऍक्टर.

या सुपरनॅचरल थ्रिलरला तेवढ्याच तोलामोलाची साथ देतात ते गुलजार यांचे अद्भुत शब्द आणि अनु मलिकचं कथानकाला साजेसं वैविध्यपूर्ण संगीत.

केके आणि वसुंधराच्या आवाजातलं 'आजा गुफाओ में आ' आणि अनुपमा देशपांडेने गायलेलं 'ये रात' ही दोन इंटेन्स गाणी, हळूहळू उलगडत जात चित्रपटाचा जणू सारच सांगत राहतात.

'हट जा ओ रावण मारुंगी बाण, राम के पास हैं तिर कमान' असे शब्द असणारं वेगळ्या पॅटर्नचं 'रामलीला'ही लक्षात राहतं.

सुखविंदर सिंग आणि वसुंधरा दासच्या आसमानी आवाजातलं 'वे यारा दा कोई नही (रब्बा रब्बा) आणि केकेच्या जादूने अजरामर झालेलं 'बंदा ये बिनधास्त हैं, पाय थिरकायला लावतात. अमिताभ हा खरोखर बिनदास्त बंदा वाटतो त्या गाण्यात.

चित्राच्या आवाजातील संथ आणि सोलफुल 'हम भूल गये हैं रख के कही, वो चीज जिसे दिल कहते हैं' आणि शुभा मुदगलने गायलेलं काळीज चिरत जाणारं 'रात आती हैं, चली जाती हैं' ही गाणी मनाच्या दोन फेजेस दर्शवतात.

या सगळ्यात माझं पर्सनल फेवरीट, 'भला बुरा'.
अमिताभच्या इंटेन्स आवाजाने नटलेलं हे गाणं अजूनच परिणाम साधतं. आजच्या खोट्या, मतलबी, बेगडी आणि पापी दुनियेचं खरं खुरं चित्रण यात तेवढ्याच भीषणतेने येतं.

'भला बुरा, बुरा भला हैं
खोटे पें सब खरा पला हैं

झूठ सच का क्या पता हैं
एक गम एक बडी बला हैं
चाल ढाल सब एक जैसी
सारा कुछ ही नपा तुला हैं
सच के सर जब धुवाँ उठे तो
झूठ आग में जला हुआ हैं
भला बुरा, बुरा भला हैं
खोटे पें सब खरा पला हैं

काला हैं तो काला होगा
मौत का ही मसाला होगा
चुना कथ्था जिंदगी तो
सुपारी जैसा छाला होगा
बाप ने जना नही तो
पापियों ने पाला होगा
थुक से निकल गया था
भूक से निकाला होगा
भला बुरा, बुरा भला हैं
खोटे पें सब खरा पला हैं

वो जो अब कहीं नही हैं
ऊसपें भी तो यकीं नही हैं
रहता हैं जो फलक फलक पें
उसका घर भी जमीं नही हैं
अकल का खयाल अगर वो
शकल से भी हसीं नही हैं
पहले हर जगों पर था वो
सुना हैं अब वो कही नही हैं

भला बुरा, बुरा भला हैं
खोटे पें सब खरा पला हैं

काही काही गोष्टी जमून याव्या लागतात. राकेश ओमप्रकाश मेहरांचं दिग्दर्शन, कथेला आणि प्रसंगांना साजेसे गुलजारचे असामान्य शब्द आणि सोबतीला अनु मलिकचं दखल घेण्यासारखं काम, यामुळे या चित्रपटाला चार चाँद लागतात.

- राज जाधव (१६-०९-२०१७)

Comments

Popular Posts