दसविदानिया



'दसविदानिया'मध्ये अमर कौल (विनय पाठक) मरण्याआधी करायच्या राहून गेलेल्या / करायची इच्छा असलेल्या दहा गोष्टींची लिस्ट बनवतो.

दहापैकी सर्वात इमोशनल हे असावं.

त्याची लहानपणीची मैत्रीण आहे, नेहा भनोत (नेहा धुपिया), सोसायटीत एकत्र होते, जिवलग होते, ट्युनिंग छान जमायचं दोघांचं, दोघांचा डम्ब शराड्समध्ये (असंच लिहितात ना?) कुणी हात धरू शकत नव्हते. एवढं सगळं असूनही केवळ मैत्रीण.

आता लिस्ट मध्ये नाव टाकलं आहे त्यानं, नेहा भनोत, तिला सांगायचं कि तिच्यावर प्रेम आहे.

पण प्रत्यक्षात भेटल्यावर घडतं वेगळंच. ती त्याला घरी घेऊन जाते, तिचे लग्न झालेले असते, एक मुलगा कि मुलगीही असते. तो सर्वांना भेटतो गप्पा गोष्टी होतात, सोसायटीतल्या जुन्या आठवणी निघतात, ते किती जिवलग मित्र होते वगैरे वगैरे आणि शेवटी तो निघून जातो.

घराबाहेर बराच वेळ वाट बघत बसतो, पण पाय काही निघवत नाही. त्यानंतरचा हा सीन. खरे प्रेम करणाऱ्याचे डोळे भरतीलच नकळत. अर्थात सलग चित्रपट बघताना याचा इफेक्ट अजून परिणामकारक असेल. बघाच.

तसेच अजून एक विश, राजीव झुल्काची भेट, म्हणजे रजत कपूर, हेही जरा भावनिक प्रकरण आहे, पण ते आता नको.

- राज (२६-०५-२०१७)

Comments

Popular Posts