वॉकी

एमपीथ्री प्लेयर म्हणजे नवीन फॅड होतं त्या दिवसात, मोबाईल वगैरे तर लांबच. त्या दिवसात सगळ्यात जिवलग मित्र होता तो वॉकमन म्हणजे आमचा लाडाचा वॉकी.

झोपण्यापूर्वी मिणमिणत्या अंधारात एखादी कैसेट घ्यायची आणि टाकून द्यायची त्याच्या आ वासलेल्या तोंडामध्ये. मोस्टली गझला असायच्या, त्यातही जगजीतच असावा जास्त करून किंवा शांत तरल गाणी. मजा यायची. कधी गप्पा, कधी चर्चा, कधी नुसतंच ऐकत हरवून जाणं एखाद्या ओळीवर. कधी झोपही लागायची. तो बिचारा इमानाने एक साईड वाजवून त्यानंतरच झोपायचा.

आत्तासारखं नव्हतं तेव्हा, एखादं गाणं / ओळ आवडली की एका क्लिकवर रिवाईंड करून पुन्हा ऐकली. तरीही आवर्जून कॅसेट रिवाईंड करून परत परत ती ओळ ऐकायचो, मनसोक्त, तसल्ली होईपर्यंत. शिवाय आता एका क्षणात गाण्याचे बोलही सापडतात नेटवर. पण त्यावेळी रिवाईंड आणि प्ले या दोन्ही बटणावर बोटं ठेऊन (मधेमधे पेन घेऊन) अख्खी गाणीही लिहून काढली होती. त्या दिवसात खरी गंमत होती.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बर्याच दिवसाने भूपेंद्रच्या जादुई आवाजातलं 'करोगे याद तो' हे गाणं ऐकलं आणि हे सारं डोळ्यासमोर तरळून गेलं. शिवाय जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा प्रत्येक वेळी त्यातल्या 'गली के मोड़ पे, सूना सा कोई दरवाज़ा' वर केलेली चर्चाही आठवतेय, आणि ती ओळ ज्या तरलतेने भूपेंद्रने म्हटली आहे ते कायमचं स्टोअर झालंय मेंदूत.

गाणं तर अप्रतिम आहे यात काही शंका नाहीच, पण याचा खरा अर्क हृदयात उतरवायचा असेल तर, रात्रीच्या निर्जीव शांततेत शक्यतो कुणीही आसपास नसेल (असल्यास तेही तितक्याच शांततेत असेल) तेव्हा ते ऐकावे..

करोगे याद तो, हर बात याद आयेगी
गुज़रते वक़्त की, हर मौज ठहर जायेगी
करोगे याद तो ...

ये चाँद बीते ज़मानों का आईना होगा
भटकते अब्र में, चहरा कोई बना होगा
उदास राह कोई दास्तां सुनाएगी
करोगे याद तो ...

बरसता भीगता मौसम धुआँ-धुआँ होगा
पिघलती शमों पे दिल का मेरे ग़ुमां होगा
हथेलियों की हिना, याद कुछ दिलायेगी
करोगे याद तो ...

गली के मोड़ पे, सूना सा कोई दरवाज़ा
तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आएगी
करोगे याद तो ...

- राज जाधव (१३-०५-१७)

Comments

Popular Posts