२०१७ मध्ये पाहिलेले प्रादेशिक चित्रपट


या वर्षी बर्यापैकी प्रादेशिक सिनेमेही पाहिले आणि सर्वच आवडलेही. यातल्या अलमोस्ट चित्रपटाबद्दल ज्या त्या वेळी विस्तृत लिहिले असेल, तरीही एक ब्रिफ देतोय. पाहायला मिळाले तर नक्की पहा.

Thuparivaalan (2017) - पहिल्या मिनीटापासून उत्कंठा वाढवणारा एक जबरदस्त डिटेक्टिव्ह थ्रिलर. एका क्षुल्लक केसचा मागोवा घेत अनेक गुन्ह्यांचा आणि खुनाचा तपास करणारा डिटेक्टिव्ह इम्प्रेसिव्ह वाटतो. तुम्हाला जग्गा जासुसने निराश केले असेल तर हा पहा आणि जग्गा आवडला असेल तर हा आवर्जून पहा, खोट्या भ्रमात राहू नका.

Dhruvangal Pathinaru (2017) - एका रात्री घडलेला एक अँक्सीडेन्ट, एक मिसिंग केस आणि एक अपहरण याचा शोध घेणारा एक पोलीस ऑफिसर, त्याचा असिस्टन्स आणि त्यांच्या वेगवेगळ्या थियरीज. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा ते त्याहून अनप्रेडिक्टेबल असतं. शून्य गाणी, शून्य कॉमेडी व इतर पॅरलल ट्रॅक. अनावश्यक फिलर्स टाळून जमवलेला एक फास्ट थ्रिलर.

Theeran Adhigaram Ondru (2017) - मागे कोणतेही पुरावे न ठेवता, हायवेच्या शेजारी असणाऱ्या घरांवर दरोडे टाकणारी टोळी आणि एका लहानश्या धाग्याचा पाठलाग करत, राज्याबाहेर शोध घेत त्यांचा खात्मा करणारा निडर पोलीस ऑफिसर, या सत्य घाटनेवर आधारित चित्रपट. अनावश्यक गाणी आणि रोमॅंटिक ट्रॅक विषय भरकटवतो, अन्यथा अजून प्रभावी झाला असता.

Arjun Reddy (2017) - हा पचायला खूप जड आहे. प्रत्येकाला आवडेलच असे सांगता येणार नाही. जर 'देव डी' हा 'देवदास गॉन वाईल्ड' होता तर 'अर्जुन रेड्डी' हा 'देव डी गॉन वाईल्डेस्ट' आहे. म्हणून रिकमेंड करणार नाही. देव डी पचला असेल तरच याच्या वाटेला जा.

Maanagaram (2017) - एका शहरात घडणाऱ्या चार बेनाम मुख्य पात्रांची आणि त्यासोबत इतर सहपात्रांची कथा. एकमेकांच्या निर्णयाचा, कृतीचा इतरांच्या जगण्यावर कसा परिणाम होतो याचे अप्रतिम चित्रण. शहराची बेसिक थीम 'शोर इन दि सिटी' सारखी. तो आवडली असेल तर हा पाहायला हरकत नाही.

Angamaly Diaries (2017) अंगमली नावाच्या छोट्याश्या शहरात घडणारे, लहानश्या टोळ्या आणि त्यांचे स्वतःचे वर्चस्व बसवण्यासाठीची धडपड, असे कथानक. बेसिक आयडिया 'मेरे अपने'सारखी, ट्रीटमेंट अफलातून. एकदा पाहून अंगमली पूर्णता कळणारा विराळाच माणूस. प्रचंड पेशन्स ठेवून पाहण्याचा चित्रपट.

Oppam (2016) - एका आंधळ्या सुरक्षारक्षकाने त्याच्या असामान्य सिक्स सेन्सच्या साहाय्याने, लहान मुलीचा जीव वाचवत, एका खुन्याचा घेतलेला शोध. मोहनलालचे वय लपत नाही, थकलेला वाटतो, तो भाग सोडला तर एक उत्तम थ्रिलर. क्लायमॅक्स पिक मोमेन्ट.

Kali (2016) - काहीसा NH-10 शी साधर्म्य असलेला प्लॉट. आपल्या शीघ्रकोपी स्वभावामुळे बायकोचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणारा नवरा यांची कहाणी. त्यांना हायवेवर प्रवासात आलेले भयाण अनुभव यांचे चित्रण. NH-10 जास्त प्रभावी असला तरीही कली निराश करत नाही.

Premam (2015) - पुनश्च प्रेमात पाडणारा चित्रपट. आयुष्यातील तीन वेगवेगळ्या वळणावर झालेले तीन वेगवेगळ्या व्यक्तींसोबतचे प्रेम. ही तरल प्रेमकहाणी अनुभवायची गोष्ट आहे, इथे सांगायची नाही.

Bangalore Days (2014) - 'झोया अख्तर'ची फिल्म पाहत असल्याचा फील देणारा मुव्ही. लहानपणापासून एकमेकांशी ओढ असणारे तीन कझीन्स, त्यांचे बंगलोर मधले दिवस, तिथल्या आठवणी, स्वप्ने आणि जगण्याची एक नवीन उमेद दाखवत, नात्याची गोडी समजावून सांगणारी एक हळवी, निरागस मूव्ही.

Aranya Kaandam (2010) - एक टिपिकल वर्मा, कश्यप, राघवन टाईप निओ नॉइर क्राईम थ्रिलर. तुम्ही सत्या, कंपनी, जॉनी गद्दार, वासेपुर टाईप मूवीजचे फॅन असाल तर हा तुमच्यासाठी आहे. हळुवार गडद होत जाणारा, एक अनप्रेडिक्टेबल अनुभव.

आणि आता सर्वात महत्वाचा चित्रपट

Vikram Vedha (2017) - यासाठी इथे जागा राखून ठेवतोय, कारण यावर लिहावे लागणार आहे याची कल्पना आहे.

© राज जाधव (०३-०१-२०१७)

Comments

Popular Posts